मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

Indian jokes

अलीकडील पोस्ट

जावयाचे प्रकार

 *जावईचे प्रकार...* आपल्याकडे जावईचे चार प्रकार पडतात... *१) साखऱ्या जावई:*  साधारणत: २% जावई या प्रकारात मोडतात. हे जावई १०० किलोमीटरपेक्षा लांब किंवा परराज्यात अथवा परदेशात असतात. त्या मुळे हे वर्ष-दोन वर्षातून सासुरवाडीला जातात. म्हणून या जावयांना खाण्यासाठी गोड-धोड पदार्थ तसेच कपडे-लत्ते देवून यांचा मानपान होतो. चांगलीच बडदास्त असते याची. म्हणून हा *साखऱ्या जावई...* जावयांमध्ये उत्तम प्रकार हाच आहे...  *२) भाकऱ्या जावई:* या प्रकारात ९५% जावई मोडतात. हे जावई सासुरवाडी च्या जवळपासच राहतात, तर काही एकाच शहरात राहतात. हे सासुरवाडीला वरचेवर जात असतात. तर काही वेळेस बायकोला तिच्या आई वडिलांची आठवण आली तर तिच्या सोबत जावे लागते. यांचे जाणे येणे नेहमीचे असते त्यामुळे या जावयाला खाण्यासाठी जे घरात केले तेच वाढले जाते. तर कधी-कधी फक्त चहावर भागविले जाते... हा नेहमीचाच म्हणून काही खास मानपान नसतो, म्हणून हा *भाकऱ्या जावई...* *३) ढोकऱ्या जावई:* या प्रकारात २% जावई सापडतात. हे घरजावई असतात. या जावईला घरात पाणी सुद्धा स्वतः घ्यावे लागते. तर कधी कधी घरात भाजीपाला, दुध असे आणून द्याव...

वाचा आणि हसा

😡😜😄😝😳😩😭 पुढारी (डाँक्टराना ) : माझ्या तब्बेतीचा रिपोर्ट जरा मला समजेल अशा भाषेत सांगा.!😫😫😫😄😜 डाँक्टर : आपल्या रिपोर्ट नुसार  रक्तदाब घोटाळ्यासारखा वाढत आहे..😫😫 फुफ्फुसे खोटी आश्वासने देत आहेत..😜😄 ऊजवी कडील किडनीने आपल्या  पदाचा राजीनामा दिला आहे..😄😜😫 चरबी महागाई प्रमाणे वाढत चालली आहे. त्यामुळे,😄😜 रक्तवाहिन्यां मध्ये रास्तारोको आंदोलन चालू झालेले आहे..😫😄😜 मज्जासंस्था सुध्दा आपला पाठींबा  काढून घेण्याच्या मार्गावर आहेत..😫😫😄😜 या सा-या गोष्टींचा ताण डोक्यातील  पक्ष श्रेष्टिंवर पडत आहे. त्यामुळे, ते आपले सरकार बरखास्त करण्याच्या तयारीत आहेत.😄😜😫

नवरा बायको

  नवरा बायकोचं कडाक्याचे भांडण झाल्यामुळे बायको कायमचं घर सोडुन माहेरी निघुन जाते..! चार दिवस होऊन बायकोचा काही पत्ता नाही, म्हणुन न रहावून नवरा तिला फोन करतो... "जाऊ दे... माझंच चुकलं, माफ कर मला... तू घरी ये..!" 😘😘 बायको : "नाही.. माझं हृदय तोडलंत तुम्ही... मी नाही येणार..!" 💔💔 नवरा : "अगं घे जोडून आता आणी ये घरी..!" 💝💝 बायकोने विचारलं, "तुमच्या जवळपास ग्लास आहे..?" 😒😒 नवरा : "हो आहे..!" 🤗🤗 बायको : "फेका जोरात तो ग्लास जमिनीवर.." 😏😏 नवरा : "फेकला..!" 😟😟 बायको :"आता त्या फुटलेल्या ग्लासचे हजारो तुकडे पुन्हा जोडू शकतां..?" 😪😪 नवरा : "नाही... कारण ग्लास फुटलाच नाही.. स्टिलचा होता तो..!" 😜😜 बायको : *"तुम्ही म्हणजे ना... जाऊ द्या... या संध्याकाळी न्यायला..!"* 😛😛 😜😜😆😆😂😂😝😝

कोरोना च शाळेवर झालेले परिणाम

  परवा परवा सहावी सातवीतली एक मुलगी आपल्या काकाबरोबर मोटरसायकलवर बसून गेली. काकाला वाटलं की तिला चॉकलेट द्यावं. त्यानं तिला मोटरसायकलवरच बसायला सांगितलं, कुठं जाऊ नको म्हणून सांगितलं आणि चॉकलेट आणायला तो दुकानात गेला.  मुलगी गाडीवरच बसून सगळीकडं पहात होती. अचानक तिची नजर एका वास्तूवर खिळली. त्या वास्तूविषयी अनावर ओढ तिला जाणवू लागली, तिला असं वाटू लागलं की ही वास्तू आपल्याला बोलविते आहे. भारलेल्या माणसासारखी ती गाडीवरून उतरली आणि अनावर ओढीनं त्या वास्तूकडं जाऊ लागली.  तेवढ्यात काकाचं लक्ष तिच्याकडं गेलं. तो तिला हाका मारत तिच्या पाठोपाठ आला. मुलगी अनिमिष नजरेनं वास्तूकडं पहात पुढं पुढं चालली होती. काकानं तिला थांबवलं. एकदम भानावर आल्यासारखं तिनं काकाकडं पाहिलं. म्हणाली "काका, मी हे सगळं गेल्या जन्मात पाहिलं आहे, ही शाळा, हा वृक्ष, हे मैदान, इथं मी पूर्वी कित्ती कित्ती खेळले आहे." काकानं तिच्या डोक्यात एक टपली मारली "वेडी मुलगी, भ्यालो ना मी, अगं गेल्या जन्मात नाही, ह्याच जन्मीची ही शाळा आहे तुझी. आता कोरोनामुळं बंद आहे. ही घे चॉकलेट्स, चल, घरी जाऊ!" 🤪😂🤣😂