परवा परवा सहावी सातवीतली एक मुलगी आपल्या काकाबरोबर मोटरसायकलवर बसून गेली. काकाला वाटलं की तिला चॉकलेट द्यावं. त्यानं तिला मोटरसायकलवरच बसायला सांगितलं, कुठं जाऊ नको म्हणून सांगितलं आणि चॉकलेट आणायला तो दुकानात गेला.
मुलगी गाडीवरच बसून सगळीकडं पहात होती. अचानक तिची नजर एका वास्तूवर खिळली. त्या वास्तूविषयी अनावर ओढ तिला जाणवू लागली, तिला असं वाटू लागलं की ही वास्तू आपल्याला बोलविते आहे. भारलेल्या माणसासारखी ती गाडीवरून उतरली आणि अनावर ओढीनं त्या वास्तूकडं जाऊ लागली.
तेवढ्यात काकाचं लक्ष तिच्याकडं गेलं. तो तिला हाका मारत तिच्या पाठोपाठ आला. मुलगी अनिमिष नजरेनं वास्तूकडं पहात पुढं पुढं चालली होती. काकानं तिला थांबवलं. एकदम भानावर आल्यासारखं तिनं काकाकडं पाहिलं. म्हणाली "काका, मी हे सगळं गेल्या जन्मात पाहिलं आहे, ही शाळा, हा वृक्ष, हे मैदान, इथं मी पूर्वी कित्ती कित्ती खेळले आहे."
काकानं तिच्या डोक्यात एक टपली मारली "वेडी मुलगी, भ्यालो ना मी, अगं गेल्या जन्मात नाही, ह्याच जन्मीची ही शाळा आहे तुझी. आता कोरोनामुळं बंद आहे. ही घे चॉकलेट्स, चल, घरी जाऊ!"
🤪😂🤣😂

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा